Breaking News

प्रा.सुनिल जाधव यांची क्रीडा मंडळावर तज्ञ सदस्यपदी निवड


अहमदनगर : न्यु लॉ कॉलेजचे शारीरिक शिक्षण संचालक व महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सहसचिव प्रा.सुनिल जाधव यांची महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या विद्यापीठ क्रीडा मंडळावर तज्ञ सदस्य म्हणून 2 वर्षाकरिता नियुक्ती झाली असल्याबाबतचे पत्र नुकतेच त्यांना प्राप्त झाले आहे. प्रा.सुनिल जाधव यांचा क्रीडा क्षेत्रातील असलेला अनभुव व सातत्याने क्रीडा क्षेत्रात नवनवीन उपक्रम राबविण्यात त्यांचा मोलाचा सहभाग असतो. त्यांच्या याच अनुभवाचा उपयोग आता कृषि विद्यापीठाला होणार आहे. प्रा.जाधव यांना नुकताच महाराष्ट्र शासनाच्या वतीने शिवछत्रपती क्रीडा संघटक पुरस्कार सुध्दा मिळाला आहे. प्रा.जाधव यांच्या निवडीबद्दल अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार नंदकुमार झावरे, उपाध्यक्ष रामचंद्र दरे, सचिव जी.डी.खानदेशे, खजिनदार डॉ.विवेक भापकर, सहसचिव अ‍ॅड.विश्‍वासराव आठरे पाटील, जेष्ठ विश्‍वस्त माधवराव मुळे, अ‍ॅड.रामनाथ वाघ, न्यु लॉ कॉलेजचे प्राचार्य एम.एम.तांबे, कृषि विद्यापीठाच्या क्रीडा मंडळाचे संचालक डॉ.शरद पाटील, अहमदनगर जिल्हा विभागीय क्रीडा समितीचे अध्यक्ष डॉ.आर.एस.देशपांडे, सचिव प्रा.डॉ.विजय म्हस्के आदिंनी अभिनंदन केले.