शिवनेरी अकॅडमीमध्ये कारगील विजय दिवस साजरा


जामखेड / ता. प्रतिनिधी ।
26 जुलै कारगील विजय दिवस म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. या दिवशी कारगीलच्या सैनिकांनी दिलेल्या त्यागाची आठवन ठेवावी असे आवाहन जैन कॉन्फरन्सचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य संजय कोठारी यांनी केले. ते शिवनेरी  अकॅडमी येथील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
आपल्या प्राणाची  पर्वा न करता देशवासियांच्या संरक्षणासाठी कारगिलच्या टायगर हिल या ठिकाणी लढणार्‍या सैनिकांच्या धैर्य आणि त्यागाची  समाजाने आठवन ठेवून प्रत्येक नागरिकांनी सैनिंकाबद्दल अभिमान व आदर ठेवला पाहिजे. यावेळी शिवनेरी  अकॅडमीचे संचालक  कॅप्टन लक्ष्मन भोरे म्हणाले की, 26 जुलै 1999 या दिवशी भारतीय बहादुर जवानांनी पाकिस्तानी सैनिकांना हद्दपार करुन टायगर हिलवर आपला राष्ट्रीय झेंडा फडकवून विजय दिवस साजरा केला. गुरूवारी विजयदिनानिमित्ताने शिवनेरी  अकॅडमीच्यावतीने शहीद जवाणांना आदरांजली अर्पण केली. यावेळी   नितीन सोळंकी, नारायण नागरगोजे आदी उपस्थित होते.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget