देशभरातील लाखो भक्तांनी घेतले साईदर्शन

शिर्डी / प्रतिनिधी
साई संस्थानच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या गुरुपौर्णिमा उत्सवाच्या मुख्य दिवशी राज्यासह देशाच्या कानाकोप-यातून लाखो साईभक्तांनी साईबाबांच्या समाधीचे मनोभावे दर्शन घेतले. संस्‍थानचे अध्‍यक्ष डॉ. सुरेश हावरे आणि त्‍यांच्या सुविद्य पत्‍नी नलिनी हावरे यांच्‍या हस्‍ते समाधीमंदिरात श्रींची पाद्यपूजा करण्‍यात आली.    
साईसच्चरित या पवित्र ग्रंथाच्या अखंड पारायणाची आज सांगता  झाली. यानिमित्त साईबाबांच्या प्रतिमेची व पोथीची व्दारकामाई मंदिरातून मिरवणूक काढण्यात आली. संस्थानचे उपाध्‍यक्ष चंद्रशेखर कदम आणि विश्‍वस्‍त माजी खा. भाऊसाहेब वाकचौरे यांनी प्रतिमा, विश्वस्त बिपीन कोल्हे यांनी विणा, विश्‍वस्‍त तथा नगराध्‍यक्षा योगिता शेळके यांनी या मिरवणुकीत  पोथी घेऊन सहभाग घेतला.
दरम्यान, उत्सवाच्या मुख्य दिवशी राज्याचे गृह (ग्रामीण) वित्त आणि नियोजनमंत्री दिपक केसरकर यांनी साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल, विश्वस्त अॅड. मोहन जयकर, उपजिल्‍हाधिकारी धनंजय निकम, मनोज घोडे पाटील, नलिनी हावरे, सरस्‍वती वाकचौरे, स्मिता जयकर आदी ग्रामस्थ आणि साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget