गुरुशिवाय जीवन निर्थक व अंधकारमय -ह.भ.प. जयसिंग महाराज मडके


अहमदनगर (प्रतिनिधी) 
नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे गुरुपौर्णिमा गुरुपूजनाने उत्साहात साजरी करण्यात आली. ह.भ.प. जयसिंग महाराज मडके यांचा ग्रामस्थांच्या वतीने डोंगरे बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष पै.नाना डोंगरे यांनी सत्कार केला. यावेळी ह.भ.प. भागचंद जाधव, भाऊसाहेब ठाणगे, लहानू राहींज, बाबा चारुडे, लक्ष्मण जाधव, अशोक भुसारे, राधाबाई व्यवहारे, आशाबाई राहिंज, सिंधू भुसारे, संगीता चारुडे, सविता शिंदे, मंदाताई डोंगरे, पै.संदिप डोंगरे, राष्ट्रीय कुस्तीपटू प्रियंका डोंगरे, प्रतिभा डोंगरे, सुमन ठाणगे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
या गुरुपुजन कार्यक्रमात ह.भ.प. जयसिंग महाराज मडके यांनी आपल्या प्रवचनातून उपस्थित ग्रामस्थांना गुरुची महती सांगून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. गुरु शिष्याला ज्ञानाने प्रकाशमान करुन, यशस्वी जीवनाचा मार्ग दाखवत असतो. गुरुशिवाय जीवन निर्थक व अंधकारमय आहे. मात्र सध्या गुरु शिष्याच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याने मनुष्याच्या जीवनात देखील वेदना, दु:खाचे प्रमाण वाढले आहे. गुरुंच्या मार्गदर्शनानेच मनुष्याचे जीवन सुखी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रवचनाच्या समारोपा नंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget