Breaking News

गुणवत्ता वाढीसाठी विद्यार्थ्यांना मैदानी खेळ महत्त्वाचा -बाबासाहेब चेमटे


अहमदनगर (प्रतिनिधी) 
बदलत्या काळानुरुप आपल्या पाल्यास उत्तमोत्तम शिक्षण मिळावे म्हणून पालक जागृक आहेत. पण उत्तम आरोग्य व शरीर संपदा पाल्यास लाभावी म्हणून पालकात उदासिनता दिसून येते. गुणवत्ता वाढण्यासाठी विद्यार्थ्याचे शरीर व मन सुदृढ असावे लागले. ही सुदृढता खेळाने विदयार्थाच्या अंगी येते. गुणवत्ता वाढीसाठी विद्यार्थ्यांना मैदानी खेळ महत्त्वाचा ठरत असल्याचे राळेगणच्या श्रीराम विद्यालयाने सिद्ध केले असल्याचे प्रतिपादन जिल्हा मराठा संस्थेचे संस्था निरीक्षक बाबासाहेब चेमटे यांनी केले.
श्रीराम विद्यालयात संस्थेमार्फत आयोजीत वार्षिक शालेय तपासणी वेळी राज्य, राष्ट्रीय स्पर्धेतील खेळाडूंच्या सत्कार प्रसंगी ते बोलत होते. विद्यालयाचा मागील 13 वर्षात 12 वेळा संस्थेत सर्वोकृष्ट निकाल, मागील सहा वर्षांपासून सलग 100 निकाल, खेळात प्रत्येक वर्षी राष्ट्रीय स्पर्धेत प्राविण्य प्राप्त कामगिरी विद्यालया मार्फत झाली आहे. त्यामुळे खेळाने विदयार्थी तंदुरुस्त राहून त्यांच्या एकाग्रतेत वाढ झाल्याने गुणवत्ता दिसून येत असल्याचे मुख्याध्यापक शिवाजी कराळे यांनी सांगितले. पथक पर्यवेक्षणातील सर्व सदस्यांचे संजय भापकर यांनी स्वागत केले. श्री राजेंद्र कोतकर यांनी क्रीडा अहवाल सादर केला. विजय जाधव यांनी शालेय उपक्रमांची माहिती करुन दिली. शाळेने आजपर्यत केलेल्या आदर्शवत कामगिरीचा लेखाजोखा बापूराव साबळे व बाळासाहेब पिंपळे यांनी मांडला.
या पथक पर्यवेक्षणात संस्था निरीक्षक बाबासाहेब चेमटे व आप्पासाहेब सुरवसे, पांडूरंग गोरे, पोपट शिनगाण, रामभाऊ गोरे, बांगर सर, दिनकर मुळे, सुनिल म्हस्के आदी उपस्थित होते. याप्रसंगी राजश्री जाधव, हरीभाऊ दरेकर, विशाल शेलार व सुजय झेंडे यांनी विविध ढंगी रांगोळी रेखाटून हार तोरणे व पताका लावून व वर्ग सजावट करुन मान्यवरांचे अनोख्या पद्धतीने स्वागत केले. भिमाजी शिंदे, अशोक साबळे, शंकर झेंडे यांनी विशेष परिश्रम घेतले. सुरेश बोठे यांनी उपस्थितांचे आभार मानले.