सदगुरु नारायणगिरी महाराज प्रबोधन प्रतिष्ठानमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहातनेवासा (प्रतिनिधी) - नेवासा बुद्रुक शिवारात सुरेगाव रस्त्यावर गुरुवर्य उद्धव महाराज यांनी सुरू केलेल्या सदगुरु नारायणगिरी महाराज प्रबोधन प्रतिष्ठानच्या वतीने गुरुपौर्णिमा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. गुरूंच्या ज्ञानप्रकाशामुळेच अज्ञानरुपी अंधकाराचा नाश होतो असे प्रतिपादन उद्धव महाराज मंडलिक 
नेवासेकर यांनी यावेळी झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी बोलतांना केले. गुरुपौर्णिमेनिमित्ताने झालेल्या कार्यक्रमप्रसंगी सदगुरु नारायणगिरी महाराज यांच्या प्राकृत पादुकांचे पूजन व प्रतिमपूजन उध्दव महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर गुरूमहिमा व गुरूंची महती याविषयी उध्दव महाराज यांचे प्रवचन झाले.
 यावेळी बोलतांना उद्धव महाराज म्हणाले की गुरुपौर्णिमा म्हणजे ऋषिपरंपरेला वंदन करण्याचा दिवस असून अन्न वस्त्र निवार्‍या बरोबरच जीवनात ज्ञान ही महत्वाचे आहे. ते ज्ञान सदगुरु देतात. गुरूबद्दल श्रद्धा ठेवा, गुरुबद्दल असलेला भक्तिभाव जपण्याचे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले.यावेळी सदगुरु नारायणगिरी महाराजांची महाआरती होऊन उपस्थित भाविकांना संत सेवेकरी रखमाजी नाचन, बन्सीभाऊ आगळे, पांडुरंग गवळी यांच्या वतीने महाप्रसाद देण्यात आला. यावेळी शंकरराव लोखंडे, नगरसेवक सुनील वाघ, डॉ.लक्ष्मण खंडाळे, पंडितराव थोरात, प्रा.रामनाथ नन्नवरे, कचरू निर्मळ, प्रा.नामदेव शिंदे उपस्थित होते. यावेळी भाविकांनी सदगुरु नारायणगिरी महाराजांच्या प्राकृत चांदीच्या पादुकांचे पूजन करून दर्शन घेतले. गुरुपौर्णिमा उत्सव समितीच्या वतीने उत्कृष्ट असे नियोजन करण्यात आले.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget