अमर भारतीय विरांगणा- नीरजा भनोत

आज आपल्यापैकी बहुतेकांना नीरजा भनोत कोण हे माहीत नसेल. त्या एक भारतीय विरांगणा होत्या. ज्यांनी 1986 मध्ये स्वत:च्या जीवावर खेळून आणि बुद्धिचातुर्याने 400 जणांचे प्राण वाचवीले आणि वयाच्या 23 व्या वर्षी शहीद झाल्या. त्या भारतातील सर्वात लहान वयाच्या अशोक चक्र हे विरता पदक मिळविणार्‍या भारतीय ठरल्या होत्या. पण नंतर भारतीय त्यांच्या सवयीप्रमाणे या विरांगणेला विसरून गेले .

नीरजा भनोत या हरीश भनोत या हिन्दुस्थान टाइम्स मध्ये असणार्‍या पत्रकाराची मुलगी आणि पॅनएम 73 या एयरलाइंस कंपनीमध्ये सिनियर पर्सर म्हणून काम करणारी मुलगी. 5 सप्टेंबर 1986 मध्ये पाकिस्तान मधील कराची या विमानतळावर मुंबई ते अमेरिका अशा जाणार्‍या पॅनएम 73 एयरलाइंसच्या विमानाला चार अतिरेक्यांनी गन पॉइंट वर वेठीस धरले. त्या विमानात 400 प्रवासी होते. नीरजा सुद्धा याच विमानात होती. अतिरेक्यांना ते विमान त्यांना इस्राइल मधल्या कोणत्या तरी इमारतीला धड़कावयाचे होते. विमानात पायलट नसल्यामुळे अतिरेकी विमान घेवुन जाऊ शकत नव्हते. अतिरेक्यांनी पाकिस्तान सरकारला एका पायलट ची मागणी केली. पण पाकिस्तान सरकारने ती मागणी फेटाळली. अतिरेक्यांनी पाकिस्तान सरकारला वेठीस धरण्यासाठी प्रवाशांना मारायची धमकी दिली. त्यांनी निरजाला सर्व प्रवाशांचे पासपोर्ट गोळा करायला सांगितले. त्यातून त्यांना अमेरिकन प्रवाशांना निवडून मारायची धमकी देवून पाकिस्तानवर आणि अमेरिकेवर दबाव टाकू इच्छित होते. नीरजाने पासपोर्ट गोळा केले पण शिताफिने त्यातील अमेरिकन प्रवाश्यांचे पासपोर्ट लपवून बाकीचे पासपोर्ट अतिरेक्यांना दिले. त्यानंतर त्या अतिरेक्यांनी एका ब्रिटिश प्रवाशाला मारायची धमकी देवून पाकिस्तान सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. पण नीरजाने त्या अतिरेक्यांना समजावून त्या ब्रिटिश प्रवाशाचे प्राण वाचविले.
नीरजाच्या एका क्षणी असे लक्षात आले की आता विमानातील इंधन संपेल आणि विमानात पूर्ण अंधार होईल. या परिस्थितीचा फायदा उठवायचा असे नीरजाने ठरविले त्याप्रमाणे तिने प्लॅनिंग सुरु केले. तिने प्रवाशांना जेवण देण्याच्या बहाण्याने विमानातील आपत्कालीन दरवाजाबद्दल माहिती देणारी पत्रक प्रवाशांपर्यंत पोहोचविले . निरजाने जसा विचार केला होता तसेच घडले. थोड्या वेळाने विमानातील इंधन संपले आणि विमानात पूर्णपणे अंधार पसरला या परिस्थितीचा फायदा घेवुन निरजाने विमानाचे सर्व आपत्कालीन दरवाजे उघडले. प्रवाश्यांनी देखील पटापट विमाना बाहेर उड्या मारल्या.
अतिरेक्यांच्या लक्षात ही गोष्ट आली त्यांनी बेछूट गोळीबार सुरु केला. काही प्रवाशांना गोळ्या लागल्या पण ते बचावले. सर्व प्रवासी विमानातून बाहेर पड़ेपर्यंत निरजा विमानात थांबली होती. आता ती विमानातून बाहेर पडणार एतक्यात तिला एका लहान मुलांचा रडण्याचा आवाज ऐकायला आला. एव्हड्या वेळात पाकिस्तानी कमांडोज पण विमानाच्या आत पोहोचले होते. त्यांनी त्या चार अतिरेक्यांपैकी तिन जणांना मारून टाकले. निरजा त्या मुलांना शोधून विमानाच्या बाहेर पडत होती तेव्हड्यात तो चौथा अतिरेकी निरजाच्या समोर आला. निरजानी त्या मुलांना आपत्कालीन दरवाजाच्या बाहेर फेकून दिले आणि त्या अतिरेक्याने झाडलेल्या गोळ्या अंगावर घेतल्या. त्यातच तीचा अंत झाला. 17 तास अतिरेक्यांशी झुंजत चारशे प्रवाशांचा प्राण वाचवुन निरजाचा झालेला अंत सर्व जगाला दुःख देवून गेला .
निरजाने वाचविलेल्या त्या लहान मुलांपैकी एक जण मोठा झाल्यावर वैमानिक झाला . त्याने त्याच्या भावना व्यक्त करताना म्हणाला माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षणावर नीरजाचा हक्क आहे . भारताने नीरजाला अशोक चक्र हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देवून सन्मानित केले.
पाकिस्तानने तमगा-ए-इन्सानियत हा सर्वोच्च पुरस्कार दिला. अमेरिकेने जस्टिज फॉर विक्टम ऑफ क्राइम अवार्ड हा विरता पुरस्कार देवून सन्मानित केले .

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget