Breaking News

कृषी दिनानिमित्त शहरात वृक्षारोपन

संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, आ. स्नेहलता कोल्हे व औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजपा, युवा मोर्चा व मित्र फाऊंडेशन यांच्या विशेष प्रयत्नाने कृषी दिनानिमित शहरातील प्रगत शिवाजीरोड, बाजारतळ परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. तसेच मागील दोन वर्षापूर्वी लागवड केलेल्या 80 झाडांचा वाढदिवसदेखील पेढे वाटून साजरा करण्यात आला. तसेच येथून पुढे शहरातील सर्वच प्रभागात प्रत्येक रविवारी वृक्षलागवड करून संगोपन केले जाणार असल्याची यावेळी सर्वांनी प्रतिज्ञा केली. याप्रसंगी भाजपाचे तालुका अध्यक्ष शरद थोरात, कैलास खैरे, बाळासाहेब नरोडे, युवामोर्चा व मित्र फाऊंडेशनचे अध्यक्ष वैभव आढाव, सत्येन मुंदडा, दादा नाईकवाडे, पंडित पंडोरे, श्रीकांत नरोडे, जयवंत मरसाळे, प्रसाद नरोडे, देव बागुल, गुरुजन राय, अर्जुन मोरे, अभिषेक आढाव, चंद्रकांत वाघमारे, सागर राऊत, कल्पेश नरोडे, आकाश आंबले, निखील गुजराथी, अंकुश जोशी, गणेश रुइकर आदी उपस्थित होते.