Breaking News

मुसळधार पावसाने पाटणा जलमय

पटणा - देशाच्या पूर्वेकडील राज्यांत मान्सून पोहोचला आहे. शनिवारी बिहारच्या अनेक भागात मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे राजधानी जलमय झाली असून येथे अनेक भागात पाणी साठले आहे. यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे येथील नालंदा रुग्णालयातही मोठ्या प्रमाणावर पाणी शिरले आहे.

पाटण्यात सर्वत्र पाणी साचल्याने जणजीवन विस्कळित झाले आहे. येथील नालंदा रुग्णालयाचा अतिदक्षता विभागही यापासून सुटलेला नाही. रुग्णालयाच्या या विभागातही मोठ्या प्रमाणावर पाणी शिरले आहे. येथे साचलेल्या पाण्यात अक्षरशः मासे दिसत आहेत. याशिवाय, कंकडबाग, राजेंद्र नगर, चांदमारी रोड, डिफेंस कॉलोनी, येथेही मुसळधार पाऊस झाला. राजधानीसह बिहारच्या इतर भागातही जोरदार पाऊस झाला. येथे गेल्या एक आठवड्यात सरासरी 100 मिमी पाऊस झाला. यातील 80 मीमी पाऊस गेल्या 24 तासात बरसला आहे. यामुळे नागरिकांना पावसाचा त्रास सहन करावा लागला असला, तरी राज्यातील पाणी प्रश्‍नही मोठ्या प्रमाणावर दूर होण्यास मदत झाली आहे. हा पाऊस येण्यापूर्वी पाण्याच्या कमतरतेचे प्रमाण 50 टक्के होते. ते आता 34 टक्क्यांवर आले आहे.