पाथर्डी येथे सकल मराठा समाजाच्या वतीने ठिय्या आंदोलन, आंदोलनाचा तिसरा दिवस


               
 पाथर्डी (प्रतिनिधी)- सकल मराठा समाजाच्या पाथर्डी येथे चालू असलेल्या ठिय्या आंदोलनाच्या तिसर्‍या दिवशी बेमुदत ठिय्या आंदोलनात शिवशाहीर कल्याण काळे यांचे जनप्रवचन करण्यात आले. तर आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर सकल मराठा समाजाच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली.
यावेळी बोलताना शिवशाहीर कल्याण काळे म्हटले की, आरक्षणाला धक्का न लावता आम्हाला आरक्षण हवे आहे. हे सरकार वेळ काढूपणा करत आहे. महाराष्ट्र पेटला तेव्हा आयोगाला भेटण्याचे उशिरा आलेले शहाणपण आहे. जोपर्यंत यावर योग्य तो तोडगा निघत नाही, तोपर्यंत ठिय्या आंदोलन चालूच राहील.
तसेच शुक्रवारी सकल मराठा समाजाच्या वतीने नाईक पुतळ्याजवळ सकल बेमुदत ठिय्या आंदोलन चालू झाले असून या आंदोलनाला तालुक्यातील इतर सर्व समाजाने पाठींबा दिला आहे. तर आंदोलनादरम्यान शहरातील शाळा, कॉलेज, एस.टी., व्यापारी यांनी स्वतःहून बंद पाळून आम्हाला सहकार्य केले.  परंतु काही समाजकंटकानी व्यक्तिगत हव्यासापोटी काही व्हाट्सअप मेसेज पाठवून आमच्या आंदोलनात फूट पाडण्याचा अपयशी प्रयत्न करू पहिला. तरी अशा प्रवृत्तीचा आम्ही सकल मराठा समाजाच्या वतीने जाहीर निषेध करतो. तसेच आमदार मोनिका राजळे यांच्याबद्दल बदनामीकारक मेसेजचा निषेध करण्यात आला.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget