Breaking News

अण्णा द्रमुकचे बंडखोर नेते दिनाकरण यांच्या कारवर बॉम्ब हल्ला

चेन्नई - अण्णा द्रमुक (एआयएडीएमके) पक्षाचे बंडखोर नेते टी. टी. व्ही. दिनाकरण यांच्या कारवर एका अज्ञात गुंडाने पेट्रोल बॉम्ब फेकल्याची घटना घडली आहे. यात दोन जण जखमी झाले आहेत. घटना घडली तेव्हा दिनाकरण हे सुदैवाने कारमध्ये नव्हते. त्यांचा ड्रायव्हर आणि एक खासगी फोटोग्राफर या हल्ल्यात जखमी झाले आहेत.