Breaking News

मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

सिडको भूखंड घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्यावा, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. तर या घोटाळ्याची न्यायालयीन चौकशी करावी, अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत केली. सिडको भूखंड घोटाळ्यावरुन आज विधानसभेत विरोधक आक्रमक झाले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी नैतिक जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्यावा, अशी मागणी विखे पाटील यांनी के ली. तर या घोटाळ्याची न्यायालयीन चौकशी करावी, अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.या प्रकरणी विधानसभेत झालेल्या गोंधळामुळे तीन वेळा कामकाज तहकूब करावे लागले होते.