Breaking News

गुरुपौर्णिमेनिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

नेवासा प्रतिनिधी
येथील कै. बदामबाई गांधी विद्यालयात  गुरुपौर्णिमेनिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे दर्शन घेऊन गुरुपूजन केले. यावेळी विद्यालय प्रांगणात झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी ह. भ. प. अमृतानंद महाराज कांकरिया प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
संस्थेचे अध्यक्ष कृष्णा डहाळे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. संस्थेचे सचिव शंकरराव नळकांडे, खजिनदार अशोक गुगळे, संचालक सुभाष पल्लोड, सतीश चुत्तर, भगवान गुजराथी, जयकुमार गुगळे, माजी मुख्याध्यापक शिवाजीराव गायके यावेळी उपस्थित होते.
मुख्याध्यापक जनार्धन शेंडे यांनी स्वागत करून प्रास्ताविक केले. यावेळी माध्यमिक शालांत परीक्षेत प्रथम आलेल्या प्रतिक बाळासाहेब गरुड, द्वितीय आलेल्या श्वेता शिवकुमार आचारी, तृतीय आलेल्या अन्नामलई आचारी यांच्यासह इयत्ता पाचवी व दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा बक्षिसे देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी हभप अमृतानंद महाराज व शिक्षक गणेश एडके यांनी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरुचे भारतीय संस्कृतीत महत्व याविषयी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन शिक्षिका सुरेखा चौघुले व संजय चौधरी यांनी केले. शिक्षक विश्वनाथ नाणेकर यांनी आभार मानले.