Breaking News

विविध व्यवसायांसाठी ४३ लाखांचा निधी मंजूर : फटांगरे


संगमनेर प्रतिनिधी

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागाच्यावतीने तालुक्यातील १८२ योग्य लाभार्थींना विविध व्यवसायांसाठी ४३ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला. शेळीपालन, कुकुटपालन, मूरघास, कडबाकुट्टी यासाठी शेतकर्‍यांना मोठी मदत मिळणार आहे, अशी माहिती जि. प. कृषी व पशुसंवर्धन सभापती अजय फटांगरे यांनी दिली.

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागाच्यावतीने आयोजित आदेश मंजूरीपत्र वाटपप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सभापती निशा कोकणे होत्या. व्यासपीठावर थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजित थोरात, उपसभापती नवनाथ अरगडे, आर. एम. कातोरे, शांता खैरे, स्वाती मोरे, विष्णू राहटळ, काशिनाथ गोंदे, किरण मिंडे, अशोक सातपुते, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, दत्तात्रय कोकणे, सचिन खेमनर, पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. पानसरे, डॉ. वाकचौरे, डॉ. वर्षा शिंदे, डॉ. निर्मळ, डॉ. कढणे, डॉ. कवडे आदी उपस्थित होते.

यासंदर्भात फटांगरे म्हणाले, माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात आणि आ. डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यात सातत्याने विकास कामे होत आहेत. शासनाच्या विविध योजनांचा सातत्याने पाठपुरावा करुन योग्य लाभार्थ्यांना लाभ मिळवून दिला जात आहे. पंचायत समिती व जिल्हा परिषदेमार्फत सामान्य नागरिकांचे प्रश्‍न मार्गी लावण्यास प्राधान्य दिले जात आहे. यावेळी इंद्रजित थोरात आणि सभापती निशा कोकणे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रारंभी गटविकास अधिकारी सुरेश शिंदे यांनी प्रास्तविक केले. डॉ. वाकचौरे यांनी आभार मानले.

असे मिळणार ४३ लाख!


या योजनेमधून शेळीपालन व्यवसायासासाठी १३ लाभार्थ्यांना १० लाख ३ हजार ३५२, कुकुटपालनसाठी १ हजार, मूरघास योजनेतून ६ लाभार्थ्यांना १ लाख २६ हजार, १० मेट्रिक टन, मूरघास योजनेतून ५ लाभार्थ्यांना ४ लाख, कडबाकुट्टीयंत्रासाठी ८ लाभार्थ्यांना ६४ हजार, दोन गायींचा दुधाळ गटसाठी २० लाभार्थ्यांना १२ लाख, विशेष घटक योजनेतून शेळीपालनसाठी ३ लाख, पशुखाद्य वाटप योजनेतून १२० लाभार्थ्यांना २ लाख ९६ हजार असे एकूण १८२ लाभार्थ्यांना सुमारे ४३ लाख देण्यात येणार आहेत.