जोहरापुर फाट्याजवळ दीड तास रास्ता रोको आंदोलनशेवगाव प्रतिनिधी - सर्वच राजकीय पक्षाचा मराठा समाजाच्या आंदोलनास पाठिंबा मिळत आहे. तरीही आरक्षणाला विलंब का होत आहे . मराठा समाजाने शांततेच्या मार्गाने चालू केलेल्या आंदोलनाला मराठा समाजाने शांततेच्या मार्गाने आत्तापर्यंत 58 मोर्चा काढून राज्यांमध्ये लोकशाही मार्गाने हक्क मागण्याचा 
प्रामाणिक प्रयत्न केला आहे. परंतु मराठा आरक्षणाचा प्रश्‍न हाताळण्यामध्ये सरकार अपयशी ठरले आहे. म्हणून हा प्रश्‍न चिघळत ठेवण्याचे काम सरकारकडून होत आहे. मराठा समाजाचा आता अंत न पाहता मराठा समाजाला आरक्षण द्यावे अशी मागणी हिंगणगावचे सामाजिक कार्यकर्ते महादेव पवार यांनी केले.
        शेवगाव तालुक्यातील जोहरापुर फाट्याजवळ शेवगाव नेवासा राजमार्ग क्रमांक 40 वर हिंगणगाव ग्रामस्थांच्यावतीने मराठा समाजाला आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी तब्बल दीड तास रास्ता रोको आंदोलन करून शासनाचा निषेध करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या विरोधात
घोषणाबाजीही करण्यात आली.
        यावेळी हिंगणगावचे सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ पवार, संदीप बामदळे, संतोष मेरड, संजय पवार, प्रकाश पवार, लक्ष्मण पवार, शिवनाथ वाकळे, हरिभाऊ म्हस्के, बाबासाहेब गरड, आकाश पवार, दिगंबर वाबळे, बाळासाहेब काळे, शहराम आगळे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने या
आंदोलनात सहभागी झाले होते. या रास्ता रोको मुळे वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या.
     

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget