Breaking News

अटल विश्‍वकर्मा सन्मान योजनेचे नावनोंदणीसाठी आवाहन


कोपरगाव / श. प्रतिनिधी
कोपरगाव व राहाता तालुक्यातील इमारत बांधकाम कामगार संघटनेच्या सर्व सदस्यांनी अटल विश्‍वकर्मा सन्मान योजनेत नाव नोंदणी करून घ्यावी याबाबतचे अभियान सुरू झाले असुन, संबंधीतांनी संपर्क साधावा असे आवाहन कोपरगाव तालुका इमारत बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्‍वर रोकडे, उपाध्यक्ष सादिक पठाण, सचिव सुधाकर क्षिरसागर, खजिनदार शब्बीर शेख आदिंनी केले आहे. सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय अहमदनगर मार्फत 2 ते 31 जुलैपर्यंत या योजनेत नांव नोंदणी करता येणार आहे. 4 जुलै रोजी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी तीन वाजता ही ई पध्दतींने नांव नोंदणी करण्यांत येणार आहे