Breaking News

आई वडिलां बरोबर राहणारे जगात सुखी : इंदोरीकर महाराज


अहमदनगर : मी आई वडिलांना सांभाळतो असे न म्हणता मी आई वडिलांच्या घरात राहतो असे म्हणत जा , मी त्याच्या बरोबर आहे कारण ते माझे जन्मदाते आहे ,ज्याच्या घरातील आईच्या चेहर्‍यावर हसू आणि वडिलांच्या चेहर्‍यावर समाधान ते घर सुखी असते. आई वडिलांन बरोबर राहणारे जगात सुखी आहेत,पैशाने मिळते ते सुख आणि आंतरिक शुद्धी ने मिळते ते समाधान असते. पुस्तकी ज्ञानाने सुखी व्हाल आणि आध्यात्मिक ज्ञानाने समाधान मिळते, ज्याठिकाणी भोग आहे तिथे रोग आहे.. त्यामुळे व्यसने करू नका असा सल्ला तरुणांना देत शुद्ध विचार महत्त्वाचे आहेत असे विचार हभप निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांनी केले . सावेडी उपनगरातील वसंत टेकडी जवळील संदेशनगर मधील द्वारकामाई साई मंदिरामध्ये गुरुपौर्णिमा व मंदिराचा चवथा वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी आ संग्राम जगताप, बाबूशेठ टायरवाले, निखिल वारे,बबलू सूर्यवंशी, दत्ताभाऊ तापकिरे,संजय बुधवंत,माउली गायकवाड, अशोक औटी , शिर्डी येथील श्री व सौ ठाकूर,रेखा जरे ,सुरेखा सांगळे,गुलाब पठाण,संपत नलावडे ,शिवाजी पालवे,धीरज उकिर्डे,रवी कर्डीले,प्रताप गायकवाड, अंकुश चत्तर,विकास त्र्यंबके ,अमोल दिंडे, बाळासाहेब पवार ,अविनाश लोंढे,रवी दंडी , संदीप कॅरोलिया आदी सह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.