Breaking News

मराठा आरक्षण देण्याबाबत सर्वांचे एकमत

सरकार आणि विरोधी पक्षांचं एकमत असून राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल आल्यानंतर याप्रश्नी पुढील कार्यवाहीसाठी विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलवण्यात येणार आहे, अशी माहिती सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. सकल मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन तीव्र केले असताना या प्रश्नाची तड लावण्यासाठी सरकारी पातळीवर वेगाने हालचाली सुरू झाल्या आहेत. याबाबत आज सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी माध्यमांपुढे विस्तृत निवेदन केले. आजच्या बैठकीत मराठा आरक्षण देण्याबाबत सर्वांचे एकमत झाले आहे. यासाठी विरोधी पक्ष सरकारला पूर्ण सहकार्य करणार आहे