Breaking News

अमृतवाहिनीमध्ये सर्वगुणसंपन्न अभियंता : डॉ. वाघ

संगमनेर प्रतिनिधी
अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजमधील गुणवत्ता व नाविण्यपूर्ण उपक्रमांमुळे  अभियांत्रिकी

ज्ञानाबरोबरच सर्वगुणसंपन्न अभियंता घडत आहे, असे गौरवोद्गार तंत्रशिक्षण संचालनालयाचे

संचालक डॉ. अभय वाघ यांनी काढले.
अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालय व

व्यवस्थापन शाखेच्या प्रथम वर्ष विद्यार्थी-पालक-शिक्षक व व्यवस्थापन मेळाव्यात ते बोलत

होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे विश्‍वस्त आ. डॉ़. सुधीर तांबे होते़. व्यासपीठावर संस्थेच्या

विश्‍वस्त शरयु देशमुख, अ‍ॅड. आर. बी. सोनवणे, लक्ष्मणराव कुटे, तुळशीराम भोर, मुख्य

कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ़. एम़. ए़.  व्यंकटेश, तंत्रनिकेतनचे

प्राचार्य प्रा. व्ही़. बी़. धुमाळ, प्रा़.  के. जी. जाधव आदी उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात आ. डॉ. तांबे म्हणाले, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सोई-सुविधा,

उत्कृष्ट अध्यापन आणि भविष्यातील आढावा पालकांपर्यंत पोहचण्यासाठी सदर मेळावा

आयोजित होत आहे. कडक शिस्त, गुणवत्ता, नवीन धोरणे यासाठी राबविली जात आहे.

सहकार महर्षी कै. भाऊसाहेब थोरात यांच्या दूरदृष्टीतून आणि संस्थेचे अध्यक्ष आ. थोरात

यांच्या अथक प्रयत्नांतून अमृतवाहिनीने संपूर्ण जगामध्ये नावलौकिक मिळविला आहे़.
प्राचार्य डॉ़ एम़. ए़. व्यंकटेश यांनी प्रास्तविक केले. यावेळी उपस्थित पालकांनी मनोगत

व्यक्त केले.  कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रजिस्ट्रार प्रा. व्ही़. पी़. वाघे, अधिष्ठाता डॉ़. एम़. 

आर. वाकचौरे, प्रथम वर्ष समन्वयक प्रा. व्ही़. वाय. पाटील आदींसह सर्व विभागांचे विभाग

प्रमुख तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष प्रयत्न केले़.