Breaking News

आरक्षणासाठी धनगर समाजाचा ढोल बजाओ आंदोलनाचा इशारानेवासा (प्रतिनिधी)-  धनगर समाजाला एस.टी. अनुसूचित जाती मध्ये समाविष्ट करण्यात यावे या मागणीसाठी 20 ऑगस्ट रोजी नेवासा तहसीलदार कार्यालयावर ढोल बजाओ आंदोलन करण्याचा इशारा धनगर समाज कृती समितीच्या वतीने देण्यात आला आहे.
    याबाबत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. नायब तहसीलदार नारायण कोरडे यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी देण्यात आलेल्या निवेदनावर कृती समितीचे अध्यक्ष अशोक कोळेकर, ज्ञानेश्‍वर देवकाते, राजहंस मंडलिक, लक्ष्मण नाना घुले, शशिकांत मतकर, शिवाजी काळे, नंदू महानोर, अशोक रोडगे, आबासाहेब पंडित, भाजपचे जेष्ठ नेते नामदेव खंडागळे, किशोर विखे, लक्ष्मण दाणे, अर्जुन वाल्हेकर, संजय राशीनकर, कानिफनाथ कराडे,कारभारी खर्जुले,अजय कोळेकर, विजय कराडे, संभाजी कराडे,राजेंद्र कराडे,नामदेव कराडे,नानासाहेब कराडे,बाळासाहेब आचपळे,सुनील कराडे,ज्ञानेश्‍वर कराडे,लहानु कराडे,सोपान कराडे, संजय कराडे,सुरेश भागवत, कचरू तात्या भागवत, अशोक वाल्हेकर, सचिन वाघमोडे,खंडू कराडे,लक्ष्मण बनसोडे,अशोक वाल्हेकर,आण्णा दाणे,सयाजी ढवाण, एकनाथ धानापुणे यांच्या सहया आहेत. धनगर समाजाच्या वतीने होणार्‍या आंदोलनाची ही तयारी असून कृती समितीच्या वतीने 20 ऑगस्ट रोजी होणार्‍या या ढोल बजाओ आंदोलनाला धनगर समाज बांधवांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन कृती समितीचे अध्यक्ष अशोक कोळेकर यांनी केले आहे. आमच्या मागण्या मान्य झाल्यातर आंदोलन स्थगित करण्यात येईल अन्यथा हे व्यापक स्वरूपात करण्यात येईल असा इशाराही अशोक कोळेकर यांनी दिला आहे.