Breaking News

डी. एस. काटे यांना राष्ट्रनिर्माण गौरव पुरस्कार


शेवगाव शहर प्रतिनिधी - शेवगाव तालुक्यातील आखेगावचे भूमिपुत्र डी.एस. काटे यांना सुरभी साहित्य संस्कृती अकादमीने खांडवा (मध्यप्रदेश) तर्फे आंतरराष्ट्रीय स्थरावरच्या राष्ट्रनिर्माण गौरव सन्मान पुरस्काराने गौरवण्यात आले. सामाजिक व आर्थिक विषयावर विशेष प्रबोधन करणारे त्यांचे लिखान व व्याख्याने असल्याने या पुरस्काराद्वारे त्यांच्या कार्याची दखल घेण्यात आली. किचकट आर्थिक संकल्पना सोप्या व अचुक भाषेत मांडण्याचा त्यांचा हातखंडा आहे. कृषी क्षेत्राला चालना मिळण्यासाठी विकासाच्या वेगवेगळया पध्दती व उद्दिष्टे त्यांनी आपल्या विशेष लिखानाद्वारे मांडले आहे.