भगवान दत्तात्रयांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

**

संगमनेर : प्रतिनिधी
तालुक्यातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आणि संत ज्ञानेश्वर माऊलीच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्रीक्षेत्र अकलापूर येथे गुरुपौर्णिमेनिमित्त पहाटेपासूनच भाविकांनी भगवान दत्तात्रयांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.
यानिमित्त वेदमंत्राच्या जयघोषात भगवान दत्तात्रयांच्या मूर्तीला महाअभिषेक घालण्यात आला. यावेळी महाआरती करण्यात आली. सकाळी १० ते १२ च्या सुमारास समाजप्रबोधन ह. भ. प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांचे कीर्तन झाले.
यावेळी उपस्थित भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आला. जिल्हा परिषद कृषी व संवर्धन सभापती अजय फटांगरे, शिवसेना तालुकाध्यक्ष जनार्धन आहेर, देवस्थान अध्यक्ष भिकाजी भयै, उपाध्यक्ष दत्तात्रय आभाळे, सचिव प्रताप तळेकर, खजिनदार वसंत आभाळे, माजी उपसरपंच संतोष देवकर,  सरपंच वेणूताई दुधावडे, उपसरपंच संदीप आभाळे, विकास शेळके, सुहास वाळूंज, अरुण वाघ, बाळासाहेब मुसळे, नवनाथ आहेर, बाळासाहेब कुऱ्हाडे, शिवाजी तळेकर,  संपत आभाळे आदी उपस्थिती होती.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget