श्रीगोंदा / प्रतिनिधी ।
येथिल सकाळी 11 वाजता सिध्देश्वर मंदिरापासून मोर्चाला सुरुवात झाली. जय शिवाजी जय भवानी, काका शिंदे अमर रहे अशा घोषणा देत शहरामधून, भव्य मिरवणूक काढण्यात आली. तहसिलच्या आवारात हजारोंच्या संख्येने सर्व पक्षीय नेत्यांसह सकल मराठा समाज तसेच, विविध संघटनेचे नेतेदेखील उपस्थित होते. राज्यभर सुरु असलेल्या सकल मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यात आला. यावेळी सृष्टी जामदार या चिमुकलीने आरक्षणासंदर्भात मागण्याचे निवेदन वाचून दाखविले. त्यानंतर काका शिंदे यांना श्रध्दांजली अर्पण करून, तहसिलदार महेंद्र माळी यांना निवेदन देण्यात आले. काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. शेवटी राष्ट्रगीताने मोर्चाची सांगता झाली.
Post a Comment