Breaking News

साठे जयंतीला शासकीय सुट्टी द्या : मागणी


कोपरगाव : साहित्य सम्राट लोकशाहीर अणांभाऊ साठे यांची येत्या १ ऑगस्ट रोजी जयंती आहे. दिवशी शासकीय सुट्टटी जाहीर करावी अशी मागणी तालुका व शहरातील मातंग समाजाच्यावतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात तहसिलदारांना निवेदन देण्यात आले आहे. यात म्हटले आहे, आपल्या लेखणी आणि शाहिरीने फटकारे मारून समाज व्यवस्था घडवून आणणाऱ्या या महामानवाची जयंती प्रेरणादायी आहे. त्यात शाळा, कॉलेज, सरकारी, निमसरकारी कार्यालय, महामंडळाची कार्यालये या सर्वांना या कार्यक्रमात सहभागी होता यावे, यासाठी शासकीय सुट्टी दिली जावी. या निवेदनावर सुजल चंदनशिव, दीपक मरसाळे, रमेश वाकळे, किशन भालेराव, अमोल सौदागर, राकेश काबळे, संदीप ठोंबरे, गोपाल वैरागळ, सोमनाथ ताकवले, अनिल जाधव, रंगनाथ मरसाळे, भाऊसाहेब आवारे, सोमनाथ आहिरे, संदीप निरभवणे, नितीन साबळे, अनिल पगारे, रोहित भालेराव, दीपक वायडे, सचिन आहिरे, सागर म्हस्के आदींच्या सह्या आहेत.