शालेय विद्यार्थ्यांसाठी राशिनला मोफत वॉटर पार्क : बजाजकुळधरण / प्रतिनिधी । 
राशीन येथे वॉटर पार्कची उभारणी करण्यात येणार असुन जिल्हा परिषद शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना याठिकाणी मोफत प्रवेश दिला जाणार असल्याची घोषणा राशिनचे उद्योजक मेघराज बजाज यांनी केली. कर्जत तालुक्यातील जळगाव चौफुला जिल्हा परिषद शाळेत मोफत शालेय फर्निचर वितरण कार्यक्रमात अध्यक्षस्थानाहुन ते बोलत होते.
वासुदेव फर्निचरच्या वतीने शाळेला सहा कपाट, पाच टेबल तसेच विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी कविता बजाज, सरपंच नानासाहेब तोरडमल, मुख्याध्यापिका सविता साळुंके, सुभाष लवांडे, राजू साखरे, भाऊसाहेब जंजिरे, सुनिल डिसले, सतिष दानवले, बापूराव कदम, दादासाहेब शिंदे, कालिका क्षीरसागर, संगिता अडसरे, स्वाती जाधव आदी उपस्थित होते. यावेळी शाळेच्या वतीने मेघराज बजाज व उपस्थित मान्यवरांचा श्रीफळ, गुलाबपुष्प व पुस्तक भेट देवून सत्कार करण्यात आला.
शाळा व्यवस्थापन समिती सदस्य दादासाहेब शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. गौरव कदम व वैष्णवी घोडके या विद्यार्थ्यांची भाषणे झाली. भविष्यातही गोरगरीब लोक तसेच शाळा व विद्यार्थ्यांना मदत करू असे बजाज यांनी पुढे बोलताना स्पष्ट केले. मुख्याध्यापिका सविता साळुंके यांनी प्रास्ताविक करुन उपस्थितांचे आभार मानले. सूत्रसंचालन शिक्षक सुभाष लवांडे यांनी केले.

सितपुर शाळेला फर्निचर भेट
सितपुर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला दोन संगणक टेबल, तीन ऑफिस टेबल, दोन कपाटे भेट देण्यात आली. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नवनाथ मंडलिक, उपसरपंच आप्पासाहेब गायकवाड, बापूराव कदम, अण्णासाहेब जगताप, सतीश जगताप, छत्रभुज भवर, बाबासाहेब लवांडे, धनंजय उदमले, नाना पोले, रावसाहेब जाधव, राजेंद्र सानप आदी उपस्थित होते. अण्णासाहेब जगताप यांनी आभार मानले.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget