‘प्रवरा’मध्ये ‘कौशल्य विकास’ व्याख्यान उत्साहात

प्रवरानगर प्रतिनिधी
विद्यार्थ्यांनी  परंपरांचा आदर करताना  नवीन गोष्टी आत्मसात केल्या तर भविष्यातील बदलत्या वातावरणात वावरताना अडचणी येणार नाहीत. शिकत असतानाच  कामाचा अनुभव घेतला तर करिअर करणे सोपे होते, असे प्रतिपादन प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी भार्गव गोर्टी  यांनी केले.
‘कौशल्य विकास’ या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. भार्गव गोर्टी हे न्यूयॉर्क येथे  डाटा प्रोटेक्शन आणि अप्लिकेशन सिक्युरिटी, कोलंबिया युनिव्हर्सिटीचे संचालक आहेत. प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे महासंचालक डॉ. सर्जेराव निमसे यांनी गोर्टी यांचे महाविद्यालयाच्यावतीने स्वागत केले. यावेळी भार्गव गोर्टी यांनी कौशल्य विकास या विषयावर माहिती देताना इंग्रजी भाषेचे सध्याच्या युगातील महत्व सांगितले. परंपरांचा आदर करा. पण नवीन गोष्टी शिका, जेणेकरून पुढच्या पिढीत तुम्हाला वावरता येईल, असा गुरुमंत्र त्यांनी यावेळी दिला.
या कार्यक्रमास प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था लोणीचे डॉ. एस. बी. निमसे, डायरेक्टर जनरल, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे, सहसचिव भारत घोगरे, संचालक डॉ. हरिभाऊ आहेर, स्किल डेव्हलपमेंट व ट्रेनिंग प्लेसमेंटचे समन्वयक प्रा. धनंजय आहेर, अॅल्युमिनी रिलेशनच्या संचालिका डॉ. प्रिया राव, प्रवरा इंजिनिअरिंगचे प्राचार्य. डॉ. यशवंत खर्डे, उपप्राचार्य प्रा. विजयकुमार राठी, एस. व्ही. आय. टी. सिन्नरचे कॅम्पस डायरेक्टर व प्राचार्य प्रा. डॉ. रेड्डी, पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील तंत्रनिकेतचे प्राचार्य प्रा. मनोज परजणे, माजी विद्यार्थी समन्वयक प्रा. सचिन निंबाळकर, ट्रेनिंग आणि  प्लेसमेंट ऑफीसर प्रा. भागसेन पर्वत, प्रा. कपिल ताम्हाणे आदी उपस्थित होते. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. दिघे यांनी आभार मानले.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget