Breaking News

सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरण - सर्वोच्च न्यायालयाने सुब्रमण्यम स्वामींची याचिका फेटाळली

नवी दिल्ली - सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूप्रकरणी एसआयटीद्वारे चौकशी करण्यासाठी सुब्रमण्यम स्वामी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. पोलिसांनी याप्रकरणी चार्टशीट दाखल केली आहे, त्यामुळे याप्रकरणी आता सुनावणी करण्याची आवश्यता नसल्याचे सुर्वोच्च न्यायालयाने उत्तरात सांगितले आहे. याअगोदर सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी करताना दिल्ली पोलिसांना नोटीस पाठवली होती. त्यानंतर लवकरच चार्जशीट दाखल करू, असे उत्तर दिल्ली पोलिसांनी दिले होते. माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेते शशी थरुर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूची चौकशी एसआयटीद्वारे करण्याची मागणी भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी सर्वोच्च न्यायालयात केली होती. सुब्रमण्यम स्वामी यांनी दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सुर्वोच्च न्यायालयाच आव्हान दिले होते. दिल्ली उच्च न्यायालयाने स्वामी यांची याचिका फेटाळून लावली होती.