राशीन दूरक्षेत्रात पोलिसांचे अवैध धंद्यांकडे दुर्लक्ष, शाळा महाविद्यालय परिसरात गुटखा, दारूची सर्रास विक्री; नागरिकांमध्ये चिंतेचा विषय
सुभाष माळवे / कर्जत । 
तालुका पोलीस ठाण्याअंतर्गत येणार्‍या राशीन पोलीस चौकीच्या कार्यक्षेत्रात अवैध धंद्दांना ऊत आला आहे.
या परिसरात दारू, जूगार, मटका व राशीनच्या बाजारच्या दिवशी (मंगळवार) लाल काळा हे धंदे राजरोसपणे  सुरू आहेत. पोलीस याकडे कानाडोळा करत आहेत. नव्यानेच कर्जतचा पदभार स्विकारणारे पोलिस निरीक्षक राजेंद्र चव्हाण यांच्यासमोर राशीन पोलीस चौकीअंतर्गत येणार्‍या गावांतील ऐवध धंदे बंद करण्याचे आव्हान आहे. राशीन परीसरातील अवैध धंदे पोलिस उपनिरीक्षक वैभव महांगरे यांच्या कार्यकाळात जास्तीची वाढ झाली आहे. महांगरे हे बदली साठी पात्र आहेत. मात्र, बदली होत नसल्याने ते जाणीवपुर्वक दुर्लक्ष करतात की, काय? याबाबत दबक्या आवाजात चर्चा होत आहे. येथील अवैध धंदे बंद होण्यापेक्षा या धंद्दात उलट वाढच झाली आहे. राशीन पोलिस दूर क्षेत्रात 41 गावे येत असून, राज्यात गुटखा बंदी झाल्यापासून, त्याबाबत अत्यंत कडक कायदे करण्यात आले आहेत. मात्र राशीन दूर क्षेत्राअंतर्गत येणार्‍या गावांमधून गुटख्याबरोबरच बेकायदेशीर दारू, जूगार, मटका या अवैध धंद्दांना खत पाणी मिळत असल्याचे दिसून येत आहे. दिवसा-ढवळ्या वाळू व मुरूम चोरी होत असल्याचे चित्र आहे. त्यासाठी महसूल विभाग  आणि पोलिस यंत्रणेचा वरदहस्त असल्याची परिसरात दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. तसेच शाळा व महाविद्यालय परिसरात देखिल सर्रास गुटखा आणि दारूची विक्री होत आहे.
पाच हजार लोकसंख्येच्या आतील गावामध्ये दारू विक्री करण्याची न्यायालयाची परवानगी नाही. त्यामुळे पाच हजार लोकसंख्या असलेल्या गावांमधून धाबे आणि पानटपरीवर दारू उपलब्ध होत असल्याने, तळीरामांचे चांगलेच फावले आहे.

कारवाईचा फार्स...
जूगार आणि मटका अशा अवैध धंद्दावर कारवाई केल्याचा फार्स राशीन दूर क्षेत्रातील पोलिसांकडून दाखवला जातो. मात्र दुसर्‍याच दिवशी हे सगळे अवैध धंदे पुन्हा जोमाने सुरू होतात. त्याचबरोबर राशीन पोलिसात रोज प्रकरणे दाखल होत असतात. मात्र महिनो-महिने ही प्रकरणे प्रलंबित असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

मिटवा-मिटवी...
राशीन पोलीसांकडून फक्त वेळकाढूपणा केला जात आहे. तसेच दोन गटातील होणारी भांडणे दाखल करून घेण्यापेक्षा परस्पर आर्थिेक तडजोड करून मिटवण्यात पोलीसांना जास्त रस असल्याचे चित्र दिसून येत आहे.

चोरीचा तपास...
विहिरीवरील विद्युत मोटारी चोरी, गाडया चोरी, तसेच घर व दुकान फोडी, छोट्या-मोठया चोर्‍या याबाबतही कोणताही तपास न लागल्याचे चित्र आहे. त्यामुळे राशीन दूर क्षेत्रातुन हे धंदे हद्दपार होणार का? असेच चालू राहणार हे पोलीसांपुढील मोठे आव्हान आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget