निमगाव वाघा येथे वृक्षरोपणाने गुरुपौर्णिमा साजरी


अहमदनगर (प्रतिनिधी) 
नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे नवनाथ विद्यालय, स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने गुरुपौर्णिमा वृक्षरोपणाने उत्साहात साजरी करण्यात आली. तर नवनाथ विद्यालयात झालेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी गुरुपूजन केले. या कार्यक्रमाने नेदरलॅण्डचे परदेशी पाहुणे भारावले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षक गोविंद बोरुडे तर पाहुणे म्हणून नेदरलॅण्डचे अ‍ॅनाकुस व बास्तीयान हे उपस्थित होते. प्रास्ताविकात प्र.मुख्यध्यापक किसन वाबळे यांनी जीवनात गुरुचे महत्त्व विशद करुन, गुरुशिवाय जीवन अपुर्ण असल्याचे सांगितले. शालेय विद्यार्थिनींनी गुरुची महती सांगणारे भाषणे केली. विद्यार्थ्यांनी शिक्षकांना गुलाबपुष्प देवून गुरुपूजन केले. नेदरलॅण्डच्या परदेशी पाहुण्यांच्या हस्ते शाळेच्या आवारात वृक्षरोपण करण्यात आले. आसिफ बेग यांनी वृक्षरोपणासाठी पाच हजार रुपय किंमतीची पन्नास झाडे उपलब्ध करुन दिली.
काशीनाथ पळसकर म्हणाले की, जीवनामध्ये प्रथम गुरु माता-पिता असतात. त्यानंतर शिक्षक व सर्वात शेवटी प्रत्येक व्यक्ती ज्याने कळत न कळत जगण्याचा अर्थ शिकवलेला असतो. गुरुपौर्णिमा ही सद्गुरुंची पौर्णिमा मानली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै.नाना डोंगरे म्हणाले की, पौर्णिमा म्हणजे प्रकाश, गुरु शिष्याला ज्ञानाने प्रकाशमान करुन, यशस्वी जीवनाचा मार्ग दाखवत असतो. विद्यार्थ्यांना घडविणार्‍या गुरुजनांना वंदन करण्याचा गुरुपौर्णिमेचा हा दिवस आहे. झाडे देखील गुरुंसारखेच आहे. गुरु जगण्याचा मार्ग दाखवितात तर झाडे ऑक्सीजन रुपाने जीवन देत असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रीय कुस्तीपटू प्रियंका डोंगरे व प्रतिभा डोंगरे यांनी गुरुवर्यांच्या मार्गदर्शनानेच आज कुस्ती खेळात प्राविण्य मिळवत असल्याचे सांगून, गुरुजनांचा आदर करण्याचे आवाहन केले. यावेळी दत्तात्रय जाधव, उत्तम कांडेकर, पिंपळगाव वाघाचे सरपंच अजय वाबळे, चंद्रकांत पवार, मंदा साळवे, आदर्श युवती पुरस्कार प्राप्त मंदाताई डोंगरे, युवा मंडळाचे अध्यक्ष पै.संदीप डोंगरे आदिंसह शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget