Breaking News

आरक्षणासंदर्भात विशेष अधिवेशनात निर्णय : आ. मुरकुटे

उपोषण मागे घेण्याची केली विनंती  

सोनई प्रतिनिधी - 29- मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणे हा एक प्रक्रियेचा भाग आहे. राज्यशासनाची याविषयी सकारात्मक भूमिका आहे. सर्व जातीधर्माने यासाठी पाठिंबा मिळत आहे. या विषयासंदर्भात राज्यात अत्यंत चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. यामध्ये भावी पिढीचे नुकसान होऊ नये, ही भावना आहे. येत्या दोन दिवसांत अधिवेशनात आविषयी निर्णय होणार आहे. त्यामुळे तरुणांनी उपोषण करू नये, अशी अपेक्षा आ. बाळासाहेब मुरकुटे यांनी व्यक्त केली.
येथील छत्रपती शिवाजी चौकात सुरु असलेल्या सकल मराठा समाजातील तरुणांच्या उपोषणाप्रसंगी आ. मुरकुटे बोलत होते. ते म्हणाले, मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागासवर्गीय आयोगाचा आल्याच्या दुसऱ्याच दिवशी विशेष अधिवेशन बोलविण्यात येणार असून यामध्ये हा विषय मार्गी लावला जाईल, अशी भूमिका स्पष्ट केली आहे. यापूर्वीही मंत्रिमंडळाची बैठक घेऊन आरक्षण समितीच्या पदाधिकाऱ्यांमार्फत मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष गायकवाड यांना लवकरात लवकर अहवाल देण्याची विनंती केली. या विषयावरून राज्यात उदभवलेल्या चिंताजनक परिस्थितीची जाणीव राज्य सरकारला आहे. सर्व पक्षाच्या प्रमुखांशी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली असून या सर्वांनी या मागणीला पाठिंबा दिला आहे. सकल मराठा समाजाची इतकी स्पष्ट आहे, की अन्य समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागत आम्हाला अतिरिक्त आरक्षण हवे आहे. ही एकदम रीतसर मागणी असून ५३ टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण देता येत नाही. त्यामुळे तांत्रिक मुद्दा उपस्थित करून एखाद्याने यावर हरकत घेतली तर चळवळीला धोका निर्माण होऊ शकतो. यासाठी मराठा समाजातील युवकांनी हाती घेतलेली चळवळ कौतुकास्पद आहे. परंतु यामध्ये युवा पिढीचे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी उपोषण किंवा टोकाची भूमिका कोणीही घेऊ नये, हेच यानिमित्ताने सांगावेसे वाटते. दरम्यान, दि. १ ऑगस्टपर्यंत राज्य सरकारने हा प्रश्न न सोडविल्यास आमरण उपोषण करण्याचा निर्धार केला असल्याचे सकल मराठा समाजातील तरुणांनी यावेळी सांगितले.    
यावेळी ‘दैनिक लोकमंथन’चे वरिष्ठ उपसंपादक बाळासाहेब शेटे, ज्येष्ठ पत्रकार सोपानराव दरंदले, शिवसेनेचे प्रकाश शेटे, अरुण दरंदले, अरुण चांदघोडे, अनिल बारहाते, संजय भळगट, ऋषिकेश शेटे आदींसह उपोषणकर्ते संदीप लांडे, अनिकेत दरंदले, अविनाश दरंदले, ऋषिकेश गीते, अक्षय वराळे उपस्थित होते.