Breaking News

गुरु पौर्णिमा उत्सवाची उत्साहात सांगता

शिर्डी/प्रतिनिधी
साई संस्थानच्यावतीने दि. २६ पासून सुरु असलेल्‍या गुरुपौर्णिमा उत्‍सवाची सांगता ह. भ. प.  चारुदत्‍त आफळे यांच्‍या काल्याच्या किर्तनाने झाली.
उत्‍सवाच्‍या सांगतादिनी संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल व प्रखर अग्रवाल यांनी समाधी मंदिरात श्रींची पाद्यपूजा केली. तर उपजिल्‍हाधिकारी धनंजय निकम व त्‍यांची सुविद्य पत्‍नी मनाली निकम यांनी गुरुस्‍थान मंदिरात रुद्राभिषेक पुजा केली. सकाळी १०.३० वाजता काल्याच्‍या किर्तनानंतर दहिहंडी फोडण्‍यात आली. यावेळी संस्‍थानचे अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्‍थ व साईभक्‍त मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.
उत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे, उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल व विश्वस्त मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्‍हाधिकारी धनंजय निकम, मनोज घोडे, उपकार्यकारी अधिकारी बाबासाहेब घोरपडे, पोलिस उपअधिक्षक आनंद भोईटे आदींसह सर्व प्रशासकीय अधिकारी, सर्व विभागप्रमुख व सर्व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.