Breaking News

गणेशोत्सवास थर्माकोल वापरण्यास मनाई गणेशोत्सव होणार इकोफ्रेंडली ; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

मुंबई : गणेशोत्सवामध्ये सजावटीसाठी थर्माकोल वापरू द्यावे, अशी याचिका थर्माकोल फॅब्रिकेटर अँड डेकोरेटर असोसिएशनकडून करण्यात आली होती. ही याचिका मुंबई उच्चन्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावली. न्या. अभय ओक व न्या. रियाझ छागला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. गणेशोत्सवासाठी थर्माकोलची खरेदी काही महिन्यांपूर्वीच होते. मखर तयार करण्याकरिता घाऊक विक्रेते खूप पूर्वीच थर्माकोलची खरेदी करतात. मखर कलाकारांनी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक यापूर्वीच केली आहे. पण, बंदीमुळे त्यांचे मोठे नुकसान होईल असे असोसिएशनकडून सांगण्यात आले. गणेशोत्सवानंतर दहा दिवसांच्या आत थर्माकोलचा मखर परत केल्यास पाच टक्के रक्कम परत केली जाईल. उत्पादकांनीही प्रदूषण न करता थर्माकोलची विल्हेवाट लावण्याचे आश्‍वासन दिले आहे. यासर्वाचा विचार करता गणेशोत्सवामध्ये थर्माकोल वापरू द्यावे, असे असोसिएशनकडून याचिकेद्वारे सांगण्यात आले. यावर पर्यावरणाला हानिकारक गोष्टींना परवानगी देणे शक्य नाही, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. प्लास्टिक आणि थर्माकोल यासारख्या वस्तूंची विल्हेवाट लावण्यासाठी पुरेसा वेळ दिलेला आहे, असेही न्यायालयाने सांगितले.
हानीकारक गोष्टींना परवानगी देणे शक्य अयोग्य 
गणेशोत्सवानंतर दहा दिवसांच्या आत थर्माकोलचा मखर परत केल्यास पाच टक्के रक्कम परत केली जाईल. उत्पादकांनीही प्रदूषण न करता थर्माकोलची विल्हेवाट लावण्याचे आश्‍वासन दिले आहे. यासर्वाचा विचार करता गणेशोत्सवामध्ये थर्माकोल वापरू द्यावे, असे असोसिएशनकडून याचिकेद्वारे सांगण्यात आले. यावर पर्यावरणाला हानिकारक गोष्टींना परवानगी देणे शक्य नाही, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले