शिरसगावात उमटले मराठा आंदोलनाचे पडसाद

दोन सदस्यांनी दिले राजीनामे
कोपरगाव प्रतिनिधी :
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरु असलेल्या आंदोलनाचे पडसाद तालुक्यातील  शिरसगाव सावळगाव येथे उमटले. सकल मराठा समाजाच्यावतीने बाजारपेठेतील व्यापार्यांनी  व नागरिकांनी गाव बंद ठेवत कै. काकासाहेब शिंदे यांना वाहिली. दरम्यान, येथील ग्रामपंचायत सदस्य राजू रशीद पटेल आणि महिला सदस्या मनीषा चौधरी यांनी पदाचे राजीनामे सरपंच सुनील उकिरडे यांच्याकडे दिले.
यावेळी नारायण गायकवाड, सावळेराम भागवत, कैलास मढवे, शिवाजी जाधव, सलीम पटेल, अशोक उकिरडे, भाऊसाहेब उकिरडे, रविकांत भवर, मच्छिंद्र भवर, डॉ. बबन जाधव, राहुल गायकवाड, बिलाल शहा, राजू मोरे, ज्ञानेश्वर निकम, विलास जाधव, नितीन चौधरी, प्रभाकर उकिरडे, मच्छिंद्र भुजाडे, सुनील जगताप, विनोद भागवत, अशोक शिंदे, संजय साळवे, गणेश गायकवाड, सुदाम पंचमेढे, नवनाथ भोसले, गणपत उकिरडे, रामभाऊ भागवत, सुभाष लासुरे आदी समाज बांधव उपस्थित होते.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget