Breaking News

किरण कुमार रेड्डी पुन्हा काँग्रेसमध्ये दाखल

नवी दिल्ली : आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन. किरण कुमार रेड्डी पुन्हा काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत. रेड्डी यांनी आज दिल्लीत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राहुल गांधी यांनी त्यांचे पक्षात दाखल झाल्याबद्दल स्वागत केले आहे. आंध्र प्रदेशमधून तेलंगणा राज्य वेगळे करण्याच्या निर्णयाला रेड्डी यांनी तीव्र विरोध केला होता. यामुळे त्यांनी 2014 मध्ये मुख्यमंत्रिपदासह काँग्रेसचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी आपल्या जय सम्यक आंध्र पक्षाची स्थापना केली होती. आता पुन्हा ते काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत.