Breaking News

राजुरमध्ये बँकेमार्फत शेतकरी मेळावा


राजुर / वार्ताहर ।
बँक ऑफ महाराष्ट्र शाखा राजुर यांच्या वतीने, राजुर येथे शनिवार दि. 28 जुलै 2018 रोजी शेतकरी मेळावा घेण्यात आला. या वेळी बँक मॅनेजर विवेक सद्गीर यांनी शेतकर्‍यांना महाबँक किसान क्रेडिट कार्ड, पीक कर्ज व कृषी क्षेत्राच्या आदी योजना शेतकर्‍यांना सविस्तर माहितीसह सांगीतल्या. कर्जा साठी 7/12 व 8 अ चतुःसीमा आणि सोसायटीचा नाहरकत दाखला असे कागदपत्रे असणार्‍यास कर्ज दिले जाईल अशी माहिती सदगीर यांनी दिली.
या कार्यक्रमास राजुरमधुन बहुसंख्येने शेतकरी उपस्थीत होते. गरजु व्यक्तीला कर्जाची वाटप केली जावे असे मत, यावेळी ग्रामपंचायत सदस्य भास्कर येळमामे यांनी मांडले तसेच राजुर गावचे उपसरपंच गोकुल कानकाटे यांनी सांगितले की, भात पीक हे आपल्या भागात मोठ्या प्रमाणात असते तरी, भात पीकाला कर्ज भेटावे असे मत व्यक्त केले, या वेळी राजुर गावचे माजी सरपंच काशीनाथ भडागे यांनी बँक ऑफ महाराष्ट्रची शाखा राजुरमध्ये 1976 साली सुरू झाली. त्यावेळचे सभापती व माजी मंत्री मधुकर पिचड यांच्या अथक प्रयत्नांतुन राजुर मध्ये सुरु झाल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी अरुन माळवे, विजय लहामगे, माजी सरपंच गणपत देशमुख, पंचायत समीतीचे सदस्य दत्ता देशमुख, सचिन वालतुले, ग्रा. सदस्य गौरव माळवे, शेखर वालझाडे, पाडुरंग वालझाडे आदी मान्यवर उपस्थीत होते. या कार्यक्रमास एलआयसीचे गिरीश बोर्‍हाडे, अशोक वराडे, चंद्रकांत महाले, देवराम सुपे, गजानन चांडोले यांनी सहकार्य केले.