Breaking News

गायकवाड यांचा रिपब्लिकन पक्षाचा राजीनामा; भाजपाने विश्‍वासघात केला : अशोक गायकवाड


अहमदनगर/प्रतिनिधी
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी भारतीय जनता पक्ष सोबत केलेल्या राष्ट्रीय युतीचे सकारात्मक परिणाम आलेले नाही असा आरोप करत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे प्रदेश सचिव व प्रवक्ते अशोक गायकवाड यांनी आपण आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याचे पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केले. दरम्यान, 4 ऑगस्ट रोजी नाशिक येथे युनायटेड रिपब्लीकन पक्षाची स्थापना केली जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
गायकवाड यांनी या संदर्भामध्ये रिपाई पक्षाबरोबर युती करताना दिलेली राजकीय आश्‍वासने भारतीय जनता पार्टीने न पाळत विश्‍वासघात केला आहे त्यामुळे रिपाई पक्षातील ज्येष्ठ नेते व कार्यकर्ते प्रचंड अस्वस्थता निर्माण झालेली आहे.भाजपाने आंबेडकरी जनतेवर वर गेली चार वर्ष भावनात्मक राजकारण केले उदाहरण स्मारक लंडनमधील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे घर इत्यादीचा समावेश आहे. परंतु आर्थिक दृष्ट्या आंबेडकरी समाजाला नेस्तनाबूत करण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू आहेत उच्च शिक्षणाची स्कॉलरशिप बंद क रण्यात आलेली आहे, शासकीय कर्मचार्‍यांची पदोन्नती रोखणे शासकीय सेवेतील नोकर्‍यांमधील अनुशेष भरण्यासाठी तयार करणे केंद्र व राज्याचे वार्षिक बजेट मध्ये अनुसूचित जाती-जमातीचे विकासाकरता अत्यल्प तरतूद केली आहे, भाजप आणि रिपब्लिकन पक्षाला एक मंत्री पद व विधानपरिषद महामंडळ देण्याचे मान्य केले होते तेथे विश्‍वासघात करण्यात आला असल्याचे ते म्हणाले.