Breaking News

गुरुपोर्णिमा गोंदवलेकर महाराज सप्ताहाची पालखी मिरवणुक उत्साहात साजरी


नगर - वसंत टेकडी शिलाविहार येथील श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज मंदिरात गुरुपोर्णिमे निमित्त सुरु असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची आज (दि.27) रोजी सकाळी भव्य पालखी मिरवणूक होवुन काल्याचे किर्तन झाल्यानंतर महाआरती व महाप्रसादाने उत्साहात सांगता झाली.
सकाळी श्रींच्या मुर्तीस महाभिषेक करुन पादूकांची, चरित्रग्रंथाची विधीवत पूजा नगरसेविका रुपालीताई वारे व माजी नगरसेवक निखिल वारे, बारा बलुतेदार महासंघाचे जिल्हाध्यक्ष माऊली गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आली. पौराहित्य सुंदरदास रिंगणे यांनी केले.
शिलाविहार, पाईपलाईनरोड, श्रीराम चौक, वसंत टेकडी, परिसरातून श्रीराम जय राम जय जस राम नामघोषात पालखी मिरणुक काढण्यात आली. चौकाचौकात श्रींच्या पादुकांचे पूजन भाविकांनी केले. मिरवणुकीनंतर ह.भ.प. गोविंद महाराज गवळी यांच्या काल्यचे किर्तन होवुन महाआरती झाल्यानंतर महाप्रसादाने सांगता झाली. गेले सात दिवस बीडचे ह.भ.प.नंदकुमार रामदाजी महाराज यांची भागवत कथा उत्साहात पार पडली. अखंड नाम जप व धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले. सौ.रेखाताई रिंगणे यांनी ब्रम्हचैतन्य सेवा भावी मंडळाच्या सर्वांचे आभार मानले.