Breaking News

तृणमूल काँग्रेसच्या कार्यालयात स्फोट; 1 ठार, 5 जखमी


मिदनापूर : पश्‍चिम बंगाल येथील पश्‍चिम मिदनापूर जिल्ह्यातील मकरमपूरमधील मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृण मूल कॉग्रेस (टीएमसी) पक्षाच्या कार्यालयात एक भयंकर स्फोट झाला आहे. हा स्फोट इतका मोठा होता की, यामध्ये कार्यालयातील एका टीएमसी कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला आहे तर पाचजण जखमी झाले आहेत.