केरळात पावसाचे थैमान ; 20 जणांचा मृत्यू

कोच्ची/वृत्तसंस्था : केरळात पावसाने थैमान घातले असून, सतत कोसळणार्‍या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. पावसामुळे आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. जोरदार पावसामुळे रस्ते आणि रेल्वे रुळाखालील जमीन खचली असून काही ठिकाणी रस्ते वाहून गेलेत. त्यामुळे याचा परिणाम दळवळणावर झालाय. पावसामुळे इडुक्कीमध्ये 11, मलप्पुरममध्ये 6 तर कोझिकोडमध्ये दोन आणि वायनाड येथे एका व्यक्तीचा मृत्यू झाला. जोरदार कोसळणार्‍या पावसामुळे नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली. त्यामुळे इटुक्की धरणाचा दरवाजा उघडण्यात आला. धरण परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. राज्य इलेक्ट्रिक बोर्डने रेड अलर्ट जारी केले आहे. धरणात 2400 फुट पाणी भरले आहे. राज्य सरकारने एनडीआरएफच्या 6 अतिरिक्त तुकड्यांची मागणी केली आहे. सावधगिरी म्हणून कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडने सूचित केले आहे की, 2.30 वाजता येणार्‍या विमानांना अन्यत्र वळविण्यात आले आहे. त्यामुळे बाहेर जाणार्‍या विमानांवर याचा परिणाम होणार नाही. केरळचे मुख्यमंत्री पिनायरी विजयन यांनी सांगितले की, पावसामुळे इडुक्कीमध्ये 11, मलप्पुरममध्ये 6 तर कोझिकोडमध्ये दोन आणि वायनाड येथे एका व्यक्तीचा मृत्यू झालय. तसेच पुढीक काळात पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापनाला सर्तकतेचा इशारा देण्यात आला. अधिक सावधगिरी बाळगण्यामुळे पुणमदा झील वर आगामी नेहरू व्होट रेस स्थगित करण्यात आली. 

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget