Breaking News

पी. चिदंबरम यांना 28 जूनपर्यंत अटकपूर्व जामीन मंजूर

नवी दिल्ली - दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना 28 जूनपर्यंत अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. चिदंबरम यांनी सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (सीबीआय) आणि अंमलबजावणी संचालनालय (ईडी) यांच्याकडून अटक टाळण्यासाठी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. आयएनएक्स मीडियाला परदेशी गुंतवणुकीत इनव्हेस्टमेंट प्रमोशन बोर्डकडून दिलेल्या मंजुरी संदर्भात चिदंबरम आणि त्यांचे पुत्र कार्तिक सीबीआय आणि ईडीच्या रडारवर आहेत. या माध्यमातून त्यांनी पीटर मुखर्जी आणि इंद्राणी मुखर्जी यांना फायदा मिळवून दिला होता. असा, या दोघांवर आरोप आहे. यूपीए सरकारच्या काळात चिदंबरम अर्थमंत्री असताना 2007 मध्ये हा कथित गैरव्यवहार झाला होता.