Breaking News

टीम टॉपर्स स्केटिंग अ‍ॅकॅडमीच्या वतीने 2 सप्टेंबरला जिल्हास्तरीय खुल्या स्पीड स्केटिंग स्पर्धेचे आयोजन


अहमदनगर (प्रतिनिधी)- टीम टॉपर्स स्केटिंग अ‍ॅकॅडमीच्या वतीने रविवार दि.2 सप्टेंबर रोजी जिल्हास्तरीय खुल्या स्पीड स्केटिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धा 7 गटात तर इनलाईन, टेनासिटी, क्वाड या प्रकारात घेण्यात येणार असल्याची माहिती अ‍ॅकॅडमीचे सचिव सागर भिंगारदिवे यांनी दिली.
या स्पर्धेमध्ये वय वर्षे 4, 6, 8, 10, 12, 14 व खुल्या गटाचा समावेश आहे. स्पर्धेतील विजयी खेळाडूंना पदक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले जाणार आहे. ही स्पर्धा बुरुडगाव रोड, नक्षत्र लॉन शेजारील कै.पुंडलिकराव भोसले स्केटिंग रींगमध्ये रंगणार आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त खेळाडूंना सहभागी होण्याचे आवाहन अ‍ॅकॅडमीचे अध्यक्ष प्रशांत पाटोळे यांनी केले आहे. स्पर्धेत सहभागी होणार्‍या खेळाडूंना नांव नोंदणी व अधिक माहितीसाठी सागर भिंगारदिवे- 77 09890099, प्रशांत पाटोळे- 8087870899, आकाश भिंगारदिवे- 9921266364 यांच्याशी संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे.