माळशेज घाटात 31 ऑगस्टपर्यंत पर्यटकांना बंदी


ठाणे : माळशेज घाटात 31 ऑगस्टपर्यंत पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. मुरबाडचे तहसीलदार सचिन चौधर यांनी याबद्दल माहिती दिली. घाटातील अतिधोकादायक धबधबे, सेल्फी पाँईट, अशा ठिकाणी पर्यटकांनी जावु नये असे यावेळी सांगण्यात आले आहे. घाटात दरड कोसळत असल्याने पर्यटकांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. माळशेज घाटात दरड कोसळली होती. त्यामुळे घाटातील वाहतुकीवर त्याचा मोठा परिणाम झाला. सुरूवातीचा काही काळ अडचणीतून मार्ग काढत सुरू असलेली वाहतूक खबरदारीचा उपाय म्हणून पूर्णपणे थांबविण्यात आली. दरड कोसळल्यामुळे मार्गावर मोठे दगड आणि मातीचा ढिग साचला आहे. दरड हटविण्याचे काम सुरू आहे मात्र घाटातील धुके, वारा आणि ढगाळ वातावरणामुळे कमी प्रकाश असल्याने दरड हटविण्याच्या कार्यात अडथळा येत आहे.


Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget