Breaking News

4 महिन्यांच्या चिमुकलीवर यशस्वी शस्त्रक्रिया


अहमदनगर / प्रतिनिधी । 25
येथे नुकत्याच एका चार महिण्यांच्या चिमुकलीवर यशस्वी नेत्रशस्त्रक्रिया करण्यात आली. तिला जन्मजात होणारा मोतिबिंदू आणि रूबेला रेटीनोपेथी ( गर्भाशयात असतांना आईला होणार्‍या रूबेला इन्फेक्शनमुळे बाळाला होणारा आजार) असल्याचे नगर येथील पेडीयाट्रीक आपथॉल्मोजिस्ट डॉ. विमल राजपूत यांच्या निदर्शनास आले. एवढ्या कमी वयात होणार्‍या मोतिबिंदूवर वेळीच उपचार न केल्यास कायमचा दृष्टीदोष उद्भवू शकतो, या कारणानेच डॉ. विमल राजपूत यांनी तिच्यावर मोतिबिंदू शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. मात्र बाळाला असणारा हृदयरोग हादेखील भूल आणि ऑपरेशनसाठी मोठा अडथळा होता. तरिही हा धोका पत्कारून लवकरात लवकर योग्य उपाय करण्याचे ठरले. यामध्ये त्यांना भूलतज्ज्ञ डॉ. ललीत जोशी, डॉ. अशोक देठे, नेत्रतज्ज्ञ डॉ. राजीव चिटगोपेकर तसेच एशियन नोबल रूग्णालय यांचे सहकार्य लाभले. डॉ. विमल राजपुत हे अहमदनगर जिल्हा रूग्णालयाचे मा. सिव्हिल सर्जन डॉ. आसाराम भालसिंग यांचे जावई आहेत, नगरकरांच्या सेवेत लवकरच रूजू होत असलेल्या प्राईम व्हिजन सुपरस्पेशालिटी आय केअर या हॉस्पिटलच्या माध्यमातून लहान मुलांची नेत्रसेवा तसेच तिरळेपणावर उपचार आदी सुरक्षा पुरविण्याचा त्यांचा मानस आहे.