Breaking News

राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी 9 ऑगस्टला निवडणूक

नवी दिल्ली : राज्यसभेच्या उपसभापती पदासाठी गुरुवारी 9 ऑगस्टला निवडणूक होणार आहेत. सभापती एम वेंकैया नायडू यांनी आज राज्यसभेत याची घोषणा केली. त्यांनी म्हटलं की, यासाठी बुधवारी 8 ऑगस्टला 12 वाजेपर्यंत अर्ज दाखल करु शकता. सभापतींनी पुढे म्हटले की, 9 ऑगस्टला सकाळी 11 वाजता कागदपत्र सभागृहापुढे ठेवल्यानंतर उपसभापतीपदाची निवड केली जाणार आहे. मागचे उपसभापती पी. जे कुरियन यांचा कार्यकाळ मागच्या महिन्यातच संपला आहे. भाजपकडून उपाध्यक्ष आणि राज्यसभेत पक्षाचे नेते प्रसन्ना आचार्य यांना उपसभापती पदासाठी मैदानात उतरले जावू शकते. राज्यसभेत 245 सदस्य आहेत. राज्यसभेत उपसभापतीची निवडणूक जिंकण्यासाठी 122 जणांचा पाठिंबा असणे गरजेचे आहे.