Breaking News

वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनात्मक शिक्षणाच्या आदान प्रदानाची गरज- मुख्यमंत्री


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनात्मक शिक्षणाच्या आदान प्रदानाची गरज ओळखून हे केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्याचा लाभ देशातील तसेच परदेशातील नागरिकांना उत्तम आरोग्य सेवेसाठी होईल. माहिती तंत्रज्ञानाच्या वापरामुळे जग जवळ येत आहे. त्याचा वापर करून जागतिक स्तरावरील सर्वोत्तम ज्ञान आणि यशकथा विद्यार्थ्यांना देता आल्या तर सामान्य नागरिकाला निरोगी आरोग्य लाभण्यास मदतच होईल. ज्ञान मिळवितानाच ते इतरांना देखील देण्याची गरज आहे. आपल्या देशातील पारंपरिक अशा आयुर्वेद आणि योगाभ्यासाचा जागतिक पातळीवर स्वीकार झाला आहे. त्याच्या माध्यमातून अनेकांना निरोगी आयुष्यमान मिळाले आहे.

आरोग्य क्षेत्रातील गुणवत्तापूर्ण उपचाराची गरज लक्षात घेऊन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी देशातील सामान्य नागरिकाला आधार देणारी आयुष्यमान भारत योजना सुरू केल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले.