Breaking News

पोतेवाडी रस्त्याचे भाग्य उजळले, मनसेचे लक्ष्मण कानडे, यांनी स्वखर्चाने केलं मुरुमीकरण


जामखेड / प्रतिनिधी 

तालुक्यातील नान्नज-जवळके रस्त्यावरील पोतेवाडी फाटा ते पोतेवाडी रास्ता गेल्या दोन वर्षापासून डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत होता. याची दखल घेवून सामाजिक कार्यकर्ते व मनसेचे लक्ष्मण कानडे व पोतेवाडी ग्रामस्थांनीच पुढाकार घेवून स्वखर्चाने 1 कि.मी रस्त्याचे मुरुमीकीकरण करण्यात आले आहे. पावसाळ्यात चिखल तुडवतच या रस्त्यावरून मार्ग काढावा लागत असल्याने रस्त्याचे मुरुमीकरण झाल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

जामखेड तालुक्यातील नान्नज-जवळके रस्त्यावरील पोतेवाडी फाटा ते पोतेवाडी 2 किलोमीटर अंतरापैकी पालकमंत्री ना. राम शिंदे यांच्या माध्यमातून 1 किमी अंतराचे डांबरीकरण दोन वर्षापूर्वी करण्यात आले होते. यातील 1 किमीचा रस्त्याचे डांबरीकरण रखडले आहे. पावसाळ्यामध्ये हा रस्ता अत्यंत खराब झाला होता, रस्त्याअभावी या भागातील शेतात वास्तव्य करणार्‍या शेतकर्‍यांच्या मुला-मुलींना याच चिखलातून वाट काढत शाळेला ये-जा करावी लागत होती. याकडे राजकीय पदाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देऊन, विद्यार्थ्यांची होणारी हेळसांड थांबवून राहिलेल्या रस्त्याचे डांबरीकरण करून शेतकर्‍याची होणारी गैरसोय दूर करण्याची मागणी अनेक वेळा करण्यात आली होती, मात्र या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. याबाबतची दखल घेवून सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण कानडे, पोतेवाडी ग्रामस्थांनी पुढाकार घेवून स्वखर्चाने 1 कि.मी अंतराचे मुरुमीकरणाचे काम नुकतेच पूर्ण करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते व मनसेचे लक्ष्मण कानडे, पोटेवाडीचे सरपंच विलास पोते, मनसे जिल्हा उपाध्यक्ष वैभव जामकावळे तालुकाध्यक्ष प्रदीप टापरे, सनी सदाफुले, हवा सरनोबत संतोष करडुले, नवनाथ मोरे, रघुनाथ मोहळकर, ज्ञानेश्‍वर कदम, गोरख कदम, बिबीशन कदम, भाऊसाहेब पोते, उपसरपंच प्रवीण पोते, हनुमंत मांडे, राजेश मांडे, अंबादास पोते, शिवाजी गोरे, अतुल मोहळकर, नवनाथ पोते, खंडू कवादे, अंकुश ढेपे, गणेश मोरे यांच्यासह ग्रामस्थांनी पुढाकर घेतला होता.