Breaking News

बांबू रोपणाचा भविष्यकाळात निश्चित फायदा; जिल्‍हाधिकारी द्विवेदी यांचे प्रतिपादन


राहुरी ता. प्रतिनिधी -

देवळाली प्रवरा नगरपालिकेच्‍या स्‍वच्‍छता अभियानात चांगले काम आहे. ओढया-नाल्‍यावर खोलीकरण व रुंदीकरण करुन पाणलोट क्षेत्र निर्माण केले आहे. ओढया-नाल्‍यावर दोन्‍ही बाजूला बांबूचे रोपण करण्‍यात येणार आहे. भविष्‍यकाळात त्‍याचा निश्चित फायदा होईल, असे प्रतिपादन जिल्‍हाधिकारी राहुलकुमार द्विवेदी यांनी केले.

देवळाली प्रवरा नगरपालिकेत जिल्‍हाधिकारी द्विवेदी यांनी सदिच्‍छा भेट दिली असता नगरपालिकेच्‍या स्‍वच्‍छता अभियानातील विविध प्रकल्‍पाची पाहणी करुन नवीन प्रकल्‍पासंदर्भात माहिती घेतली. शहरातील विविध भागात पाहणी करुन द्विवेदी यांनी समाधान व्‍यक्‍त केले. यावेळी नगराध्‍यक्ष सत्‍यजित कदम, उपनगराध्‍यक्ष प्रकाश संसारे, प्रांताधिकारी शैलेश चव्‍हाण, तहसीलदार अनिल दौंडे, मुख्‍याधिकारी नानासाहेब महानवार, नगरसेवक आण्‍णासाहेब चोथे, सचिन ढुस, भारत शेटे, तुषार शेटे, ज्ञानेश्‍वर वाणी, भिमराज मुसमाडे, अमोल कदम, सचिन सरोदे आदि उपस्थित होते. देवळाली प्रवरा नगरपालिका हद्दीत संपूर्ण हागणदारीमुक्‍त झाल्‍याबद्दल जिल्‍हाधिकारी द्विवेदी यांच्‍या हस्‍ते नगराध्‍यक्ष कदम, उपनगराध्‍यक्ष प्रकाश संसारे, मुख्‍याधिकारी नानासाहेब महानवार यांना प्रमाणपत्र देण्‍यात आले. 

जिल्‍हाधिकारी राहुलकुमार द्विवेदी यांच्‍या हस्‍ते स्‍वच्‍छता अभियान घनकचरा वर्गीकरणाचे उत्‍कृष्‍ट काम करणा-या सुनिल खाटीक, नितीन पटारे, अरुण सरोदे, संतोष अवसरकर, अशोक मुसमाडे, पांडुरंग कांबळे तर स्‍वच्‍छता अभियानात सहभागी झालेल्‍या शाळांचे प्रतिनिधी संपत सोनवणे, अंगणवाडी सेविका शर्मिला रणधीर तर मंगल लगे, जयश्री सुर्यवंशी, सुशिला डावखर, सविता येवले, रेखा हारदे, वैशाली शेटे आदिना स्‍वच्‍छता अभियानाचे बक्षिस पत्र देऊन गौरविण्‍यात आले. वैष्‍णवी, विजया, जिजामाता, तनिषा, गीता आदि महिला बचतगटांना जिल्‍हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्‍या हस्‍ते खेळते भांडवलाचे वाटप करण्‍यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिल गोसावी यांनी केले. गटनेते सचिन ढुस यांनी आभार केले.