Breaking News

उत्तम गुणांनी आईवडिलांचे नाव मोठे करा : आ. काबंळे


राहुरी वि. प्रतिनिधी

आईवडिलांची प्रत्येक मुलांकडून मोठ्या अपेक्षा असतात. त्या पूर्ण करण्यासाठी धडपडणे गरजेचे असते. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांनी उत्तम गुण संपादन करून आई-वडिलांचे नाव मोठे करावे, असे प्रतिपादन आ. भाऊसाहेब कांबळे यांनी केले.

राहुरी येथे राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्यावतीने १० वी आणि १२ वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा पार पडला. याप्रसंगी ते बोलत होते. २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात १० वी व १२ वी च्या परिक्षेत उत्तम गुण मिळविल्याबद्दल या विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देवून गौरव करण्यात आला. 

आ. कांबळे म्हणाले, चर्मकार समाजाला शासनाच्या मोठ्या सवलती आहेत. परंतु त्या योजना तळागाळापर्यंत पोहोचत नाहीत. या योजनांपासून खरे लाभार्थी वंचित राहत आहेत. शैक्षणिक जीवनात यश संपादन करून शासकीय नोकरीसाठी प्रयत्न करा, असा सल्ला यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले.

याप्रसंगी चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुंदरबापु तुपे, राज्य उपाध्यक्ष शिवाजी साळवे, महिला प्रदेशाध्यक्षा मिराताई शिंदे, आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढूस, नायब तहसीलदार श्री. तेलोरे, कृषी अधिकारी महेंद्र ठोकळे, राहात्याचे गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे आदींनी मार्गदर्शन केले.

यावेळी राजेंद्र बुंदेले, अ‍ॅड. संतोष कांबळे, रामदास सोनवणे, संजय साळवे, दिलीप कानडे, बापुसाहेब देवरे, शोभा कानडे, मनिषा पोटे, जिजाबा चिंधे, रत्नमाला उदमले, सुभाष भागवत, दत्ता दुशिंग, संदीप चिंधे, एकनाथ सोनवणे आदींसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

कार्यक्रम यशस्वीतेसाठी राजेंद्र पोटे सर, राजाभाऊ कांबळे, सुरेश ठोकळे, कैलास चिंधे, रवी आहेर, अभिजीत खामकर, किरण घनदाट आदींनी विशेष परिश्रम घेतले.