‘ते’ विधेयक फेटाळण्याची डॉक्टरांची मागणीकोपरगाव श. प्रतिनिधी:

डॉक्टर संघटनेच्या आय. एम. ए. मध्यवर्ती कार्यकारिणीच्या आदेशानुसार शहरातील डॉक्टर संघटनेने सकाळपासून दवाखाने बंद ठेवून ‘धिक्कार दिवस’ पाळला. राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयक हे, लोकशाहीविरोधी स्वतःच्याच उद्दिष्टांशी फारकत असणारे आहे. त्यामुळे हे विधेयक फेटाळण्यात यावे, अशी मागणी यानिमित्ताने केली जात आहे.

यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, संसदेचे हे विधेयक अनेक उपचारपद्धतींची अशास्त्रीय सरमिसळ करणारे आहे. आयुर्वेद, युनानी, होमिओ या उपचार पद्धतींच्या विकासाला मारक ठरणारे आहे. सामाजिक आरोग्याच्यादृष्टीने भयावह, धनदांडग्यांचे हीत जपणारे आहे. त्याचप्रमाणे भ्रष्टाचारजनक क्षमता असल्याने ते संसदेने संपूर्णपणे फेटाळालायला हवे. दरम्यान, शहरातील सर्व डॉक्टरांनी तहसील कार्यालय येथे जाऊन नायब तहसीलदर सुसरे यांना मागण्यांचे निवेदन दिले.

यावेळी आय. एम. ए. या संघटनेचे अध्यक्ष डॉ. गिरीष क्षत्रीय, सचिव अतिष काळे, मनिषा क्षत्रीय, अर्चना मुरूमकर, अजय गर्जे, उदय क्षत्रिय, विजय क्षीरसागर, महेंद्र गोंधळी, संजय महाजन, अनघा महाजन, पंकज बुब, आभा बुब, अमोल अजमेरे, मयूर जोर्वेकर, भगवान शिंदे, हेमंत राठी, जयंत राठी, योगेश कोठारी, शंतनू सरोवर, सचिन उंडे, शीतल उंडे, अनिल उंडे, रोहित कोद्रे, कृष्ण फुलसुंदर, सुभाष मुंदडा, सतीश अजमेर, संकेत मुळे आदी डॉक्टर उपस्थित होते.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget