Breaking News

आरक्षण बदलाचा विचार नाही : मोदी

जातनिहाय आरक्षणात कोणताही बदल करण्याचा सरकारचा कोणताही मानस नाही, त्यामुळे याबाबत कोणीही मनात शंका ठेऊ नये, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले.‘सब का साथ सब का विकास’, हे आमचं ब्रीद असून आरक्षण जसं आज आहे, तसंच यापुढेही राहील, त्याला कुठलाही धक्का लागणार नाही, असं पंतप्रधान मोदी यांनी आपल्या मुलाखतीत नमूद केले. राज्य किंवा केंद्र सरकारकडून कुठलाच ठोस निर्णय घेतला जात नसल्यानं इतर समाजातील अस्वस्थता वाढतेय, रोष वाढतोय. त्यामुळे भाजपा सरकारही जातीवर आधारित आरक्षण न देता, आर्थिक निकषांवर आरक्षण देण्याचा विचार करतंय, असं अनेकदा बोललं जातं. परंतु, अशा वावड्या उठवणं हा विरोधकांचा डाव असल्याचं मोदी म्हणाले.